Dilip Walse Patil | मुलीच्या विधानसभा लढण्यावर दिलीप वळसे-पाटलांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – “माझी कन्या निवडणूक लढवायला…”
मंचर : Dilip Walse Patil | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात ही निवडणूक पार पडेल अशी चर्चा आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात पुन्हा नव्याने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. “विधानसभेची निवडणूक आम्हाला मोठ्या ताकतीने आणि हिंमतीने लढवायची आहे. जिंकायचे पण आहे आणि ते आपण जिंकणारच आहोत. (Ambegaon Assembly Constituency)
काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवत आहेत की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत, तर त्यांची कन्या लढवणार आहे. माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल”, असे भाष्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते (Ajit Pawar NCP) आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथील सभेत केले आहे.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मागील ३०-३५ वर्षे आपण मला पाठिंबा दिला. तुम्ही मला सांभाळलं, आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवलं. आपण अनेक शेतीचे प्रश्न मार्गी लावले. काही पाण्याचे प्रश्न सोडवले. प्रश्न जरूर शिल्लक राहिले आहेत. विजेचे देखील प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. पुढचे पाच वर्ष मी आता रात्रंदिवस काम करणार आहोत.
आपली कामं पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भाने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने आपण सर्वांनी मदत करा. अनेक लोक बदनामी करतात, खोटंनाटं सांगतात. काही ना काही बोलतात. मात्र, त्यांच्या कोणत्याही बोलण्याला मी आज उत्तर देणार नाही. वेळ आल्यावर मी त्या संदर्भात उत्तर देईल आणि वस्तुस्थिती सांगेन,असेही वळसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान महायुती सरकारने लागू केलेल्या योजनांवर भाष्य करत आगामी काळात मतदारसंघातील उर्वरित प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य