Disha Salian Death Case | दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आमदार नितेश राणेंची चौकशी होणार

Nitesh Rane-Disha Salian

मुंबई : Disha Salian Death Case | दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने राज्याच्या राजकारणात गोंधळ उडाला. या प्रकरणावरून भाजप आमदारांकडून सातत्याने आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) आरोप होत आहे. हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी होणार आहे, मुंबई पोलिस या प्रकरणी चौकशी करणार आहेत. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा आमदार राणे यांनी केला होता.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली होती. सालियन यांच्या हत्येप्रकरणातील आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही आमदार राणे यांनी केला होता. दरम्यान, आता या प्रकरणी चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

दिशा सालियान या अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. ८ जून २०२० रोजी मुंबईतील घराच्या बाल्कनीमधून खाली पडून दिशा सालियान हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. कामाचा लोड जास्त असल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते.

त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती.
त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती.
त्याने खिडकीतून खाली पाहिले असता दिशा पडलेली दिसली. या प्रकरणाचा तपास सीबीआय देखील करीत आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत हत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आले.
दिशाचा मृत्यू झाला तेव्हा ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला आहे
असे सीबीआय (CBI) तपासात समोर आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed