Diwali 2024 | रिक्षाचालकांना एकूण पावणे सहा लाख रुपयांच्या दिवाळी स्व बोनसचे वितरण

Rickshaw Drivers

पुणे : Diwali 2024 | सगळीकडे दिवाळीचा झगमगाट, कपडे वाणसामान, फटाके इ.खरेदी असे वातावरण सध्या आहे. या खरेदीसाठी प्रवास करायला बहुतांश वेळेला रिक्षाचा वापर केला जातो. पण ही रिक्षा जे चालवतात. त्यांना मात्र अशा खरेदीसाठी, बोनस, सानुग्रह अनुदान अशी व्यवस्था नाही. पौड रस्ता परिसरातील रिक्षा चालकांनी याच्यावर 32 वर्षांपूर्वीच उपाय शोधला. आणि दरवर्षी हे रिक्षा चालक आपण राबवलेल्या योजनेतून स्व बोनस घेतात. यंदा एकूण 34 रिक्षाचालकांना जवळपास पावणे लाख रुपयांच्या स्वबोनसचे वितरण करण्यात आले.

रिक्षा पंचायत संलग्न पौड रस्त्यावरील जय भवानी रिक्षा तळ आणि आसपासच्या रिक्षा तळावरील रिक्षा चालकांनी 32 वर्षांपूर्वी दर आठवड्याला सामूहिक बचत करायला सुरुवात केली. प्रत्येक रिक्षाचालकाने दर आठवड्याला रु.10,20,50,100 असे करत आज सप्ताहाची बचत तीनशे रुपयांवर गेली आहे. या बचतीतून सभासद रिक्षाचालकाला रिक्षा दुरुस्ती,मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपणात वैद्यकीय उपचार इत्यादी करता, जर अर्थसाह्य लागले तर याच बचतीतून अल्प व्याजदरात ते केले जाते. दिवाळीच्या आत अशा सर्व पैशांची परतफेड होणं अपेक्षित असते.

जर ती झाली नाही तर दिवाळीला प्रत्येक रिक्षा चालकाला बचत व व्याज परत दिले जातात. अर्थ सहाय्य घेतलेल्या रिक्षा चालकाचे कर्ज त्यातून वजा केले जाते. दिवाळीच्या आधी वर्षभर जमलेल्या रकमेचे वितरण रिक्षा चालकांना स्वबोनस म्हणून होते. यावर्षी प्रत्येक रिक्षा चालकाला सुमारे 17 हजार रुपये स्व बोनसचे वितरण आज केले गेले. तर या रकमेवरील व्याजातून सर्वांना मिठाई दिली जाते. हे करताना रिक्षा चालक अप्पलपोटेपणा न करता रिक्षा तळाच्या परिसरातील दुर्बल घटकांनाही मिठाईची दिवाळी भेट देतात.

आज जेष्ठ पत्रकार आणि संपादक सुनील माळी आणि रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार
यांच्या हस्ते स्व बोनस व मिठाईचे वितरण करण्यात आले.
रिक्षा तळाचे प्रमुख बाळासाहेब पोकळे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब बोत्रे, मधुकर भायगुडे,
बिभिषण वाघमारे, पांडुरंग पवार, महेश पडवळ, चंद्रकांत माझीरे, भिकासाहेब मारणे,
प्रभूप्पा उमागोळ, अशोक ओव्हाळ आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा