Donald Trump | ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत एकत्र गस्त घालूया’; तेल आयातदार देशांना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आवाहन

Donald Trump

नवी दिल्ली :  Donald Trump | मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर एक मोठे विधान केले आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर संकट येण्याची शक्यता निर्माण झाली असून, विशेषतः होरमुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सागरी मार्गाच्या सुरक्षेबाबत ट्रम्प यांनी तेल आयात करणाऱ्या देशांना आवाहन केले आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 17 दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरुच आहेत. इराणकडूनही प्रत्येक हल्ल्याला तोडीसतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना महत्वाचे आवाहन केले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करु, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही जहाजांना संरक्षण देणार आहोत, अनेक देशांशी बोलत आहोत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.  

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही जहाजांना संरक्षण देणार आहोत, अनेक देशांशी बोलत आहोत. या देशांनाच सुरक्षेची गरज आहे. आम्ही फक्त १ टक्के तेल होर्मुझमधून आणतो. चीनचे ९० टक्के तेल होर्मुझमधून जाते. त्यामुळे इतर देशांनीही तिथे लष्कर तैनात करावे, आम्ही मदत करु. आम्ही इराणला तर हरवलेच आहे. ते आता फार प्रतिकार करु शकणार नाहीत. इराणचे हवाई दल, हवाई यंत्रणा नष्ट केलीय. संरक्षणासाठी इराणकडे आता काही नाही. इराणच्या सर्वोच्च नेत्यालाच आम्ही संपवलेय. खर्गवरही आम्ही हल्ला केला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसेच चर्चा करावी, असे इराणला खूप वाटतेय, पण ते अजून तयार नाहीत. त्यासाठी अजून काही काळ जावा लागेल.

You may have missed