Donkey Market In Jejuri Pune | ऐकावं ते नवलच! पुणे जिल्ह्यात भरतो चक्क गाढवांचा बाजार

Donkey Market In Jejuri Pune

पुणे : Donkey Market In Jejuri Pune | महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून असतो त्या बहुजन समाजातील लोक याठिकाणी कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शना बरोबरच गाढवांच्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात. पौष पौर्णिमा निमित्त जेजुरीतील बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीने गाढवांचा बाजार असून आज पासून (दि.१२) गाढवांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. याठिकाणी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून गाढवे विक्रीस येत असतात.

https://www.instagram.com/reel/DEub1OFJrFK/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान गुजरातमधील अम्रेली व सौराष्ट्रातून केवळ ७० काठेवाडी गाढवे विक्रीसाठी आली असून प्रत्येक गाढवाला ४० हजार ते ७५ हजार रुपये बाजार मिळेल, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे. तर बारामती, अकलूज, फलटण आदी भागातून सुमारे २०० गावठी गाढवे विक्रीसाठी आली असून या गाढवांना ३० ते ४० हजार रुपये भाव मिळेल, असे सांगितले जातेय.

पुढील दोन दिवसात आणखी गाढवे या बाजारात दाखल होतील. जेजुरी येथे भरणारा गाढव बाजार हा मोठा बाजार समजला जातो. बाजारामध्ये गाढवाचे दात, रंग पाहून त्याची किंमत ठरविली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते.

यंत्र युगात दिवसेंदिवस गाढवांचा वापर कमी होत असल्याने या गाढवाच्या बाजाराला उतरती कळा सुरू झाली आहे.
मात्र माणसांच्या भाऊगर्दीत गाढवांची किंमत वाढली असल्याचे चित्र आहे. (Donkey Market In Jejuri Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed