Dr Shankar Mugave | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ससून रुग्णालयाचे समाजसेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे यांनाराज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार प्रदान

Dr Shankar Mugave

ठाणे : Dr Shankar Mugave | तीस वर्षा पासून रात्रीचे रक्तदान हा उपक्रम कै. आनंदजी दिघे साहेबांनी सुरू केलेला आजतागायत यशस्वीपणे चालू आहे. यावेळी नवीन वर्षाच्या स्वागताला तरुणांनी दूध प्यावे व रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण करावा हेच रात्रीचे रक्तदान आयोजित करण्यामागे मूळ उद्देश होता आणि आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रक्तानंद ग्रुप ठाणे (Raktanand Group Thane) तर्फे त्यांच्या हस्ते राज्यस्तरीय रक्त कर्ण (Rakt Karn) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ससून रुग्णालयाचे (Sassoon Hospital) समाजसेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. शंकर माधवराव मुगावे (Dr Shankar Madhavrao Mugave) यांना राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला*. यावेळी राज्यातील इतर तीन ठाणेकरांचा ही सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय रक्त कर्ण पुरस्कारासाठी रक्तदान चळवळींच्या क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व वैयक्तिक नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदाते यांचा यावेळी राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार प्रदान करून सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन शतकवीर रक्तदात्ता म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला. ससून रुग्णालयाचे समाजसेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. शंकर माधवराव मुगावे यांना रक्तदान चळवळींच्या क्षेत्रात अतुलनीय काम व रक्तपेढी चा समाजशास्त्रीय दृष्टी कोणातून संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल व वैयक्तिक नियमित रक्तदान केल्यामुळे त्यांना स्थानिक , राज्यस्तरीय आणि रास्ट्रीय स्थरावरचे एकूण 35 ते 40 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ. शंकर मुगावे यांचे रक्तदान चळवळींच्या क्षेत्रात अतुलनीय काम आहेच तसेच ते स्वत: नियमित रक्तदाते आहेत.
त्यांचे आजता गायत 105 वेळा ऐच्छिक रक्तदान झाले आहे.
आणि आजतागायत त्यांनी वीस हजार च्यावर रक्तदान शिबीर आयोजित करून चार लाख रक्तदात्यांचे रक्त संकलन केले आहे.
ते रक्तदान क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहेत.
तसेच डॉ. मुगावे यांनी कोरोना महामारीच्या काळात पश्चिम महाराष्ट्राचे पुणे विभागाचे मुख्य रक्तपेढी समन्वयक म्हणून तीन वर्षे काम केले आहे.
यावेळी पुणे विभाग रक्तदान संकलनात पहिल्या क्रमांकावर होते. यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांनी त्यांचा सन्मान केला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Weather News | येत्या दोन दिवसात राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Pune RTO | खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमीट असेल तर परत करा, आरटीओ कडून होणार कारवाई

Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात

You may have missed