DSK Investors News | डीएसके ठेवीदारांचा राजकीय पक्षांप्रती नाराजीचा सूर ! विधानसभा निवडणुकीत नोटा (NOTA) चा पर्याय वापरणार

DSK Investors

पुणे : DSK Investors News | डीएस कुलकर्णी (DS Kulkarni Builder) यांच्या कंपन्यात तब्ब्ल ३२ हजार ठेवीदारांची १२००कोटी रुपयांची संघटित पणे लूट करण्यात आली, तरी असंवेदशीलता दाखविणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत डिएसके ठेवीदार नाराज असून विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कोणालाही मतदान न करता नोटा चे बटण दाबण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे.

चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डी एस के व्हिकटीम्स – Association of DSK Victims) डीएसके ठेवीदार संघटना, हिंदू महासंघाच्या (Hindu Mahasangh) मदतीने अनेक महिने आंदोलनात असून त्याचा पुढचा भाग म्हणून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

नोटा (NOTA) हा सुद्धा घटनेने नागरिकांना दिलेला अधिकारच आहे अस आम्ही मानतो असे  सुद्धा ठेवीदारांनी या वेळेस सांगितले. पत्रकार परिषदेस  हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सहित मनोज तारे ,विवेक परदेशी,विद्या घटवाई,सूर्यकांत कुंभार,नितीन शुक्ल,अदिती जोशी ठेवीदार संघटने कडून  दीपक फडणवीस ,शरद नातू ,सुधीर गोसावी ,नितीन मोरे   यांनी उपस्थित राहून माहिती दिली.

ठेवीदार,त्यांचे कुटुंबीय ,हितचिंतक असे  दीड लाख मतदार  या निवडणूकीत नोटा (NOTA ) वापरतील असे  निश्चित झाले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता ही पत्रकार परिषद झाली.

सर्व सरकारी यंत्रणा याबाबत पूर्ण असंवेदनशील असून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेतृत्वाने सुद्धा या ठेवीदारांप्रति सहानुभूती  दाखवली नसल्याने हिंदू महासंघ च्या सहकार्यने हे सर्व ठेवीदार पहिल्यांदाच राजकीय निर्णय घेण्याच्या विचार करीत होते.मेळावा घेऊन विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना पाचारण करून त्यांना हालचालींची संधी देण्यात आली. मात्र,कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस पावले उचलून ठेवीदारांना दिलासा दिला नाही.चार दिवसापूर्वी पत्रक काढून ठेवीदारांनी निवडणुकीत ठोस निर्णय घेण्याच्या आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या .तरीही राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने नोटा मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.डीएसके प्रकरणात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता उलट ती डावलून सर्व ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे, याकडे ठेवीदारांनी लक्ष वेधले आहे.

ठेवीदारांचा अखंड लढा 

२०१७ पासून डी एस कुलकर्णी यांच्या डीसके(DSK Group )कंपनीने ठेवीदारांची ठेव बरोबरच व्याजही देण्याची असमर्थतता दाखवल्यानंतर सुरू झालेला लढा आजही सुरूच आहे.DSK group मध्ये गुंतवणूक करणारे ३२ हजार ठेवीदार गुंतवणूक केलेल्या १२०० कोटीच्या परताव्याकरिता कायदेशीर लढाई लढत आहेत.DSK group विरूद्ध झालेल्या तक्रारी,नंतर दाखल झालेले गुन्हे ,सर्व संचालकांना अटक त्यानंतर न्यायालयाने १६ हजार कोटींची मालमत्ता फक्त ८२८ कोटींना ठराविक बांधकांम व्यवसायिकांना ७ वर्षाच्या मुदतीसह देण्याचा निर्णय घेताना कुठेही ठेवीदारांचा विचार न करणे थोडेसे संशयास्पद वाटते या प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा स्पर्श झाल्यासारखे दिसत आहे.

या  परिस्थितीची चर्चा संपुर्ण राज्यात सुरू असताना मागील ७ वर्षात कुठल्याही लोकप्रतिनिधी ,
राजकीय नेते व सहकार महर्षींना आभाळ कोसळलेल्या ज्यांचे कष्टाची ठेव बुडतेय यांची दखल
घेण्याची इच्छा झाली नाही.विषयाचे गांभीर्य कोणालाही नसून सातत्याने अनेक बँका अचानक बंद होणे
सहकार माध्यमात ठेवीदारांची ठेव बुडल्यास विश्वासार्हता संपुन सहकारी क्षेत्रात ठेवीदार गुंतवणूक
करणे बंद होतील . 

मागील महिन्यात हिंदू महासंघ व ठेवीदार यांनी आयोजित मेळाव्यात आवाहन करूनही अगदी विधानसभेच्या
निवडणूका असताना देखील ३२ हजार कुटुंब म्हजेच १.५० लाख जनतेच्या गंभीर विषयाकडे बघण्यास
कुणालाही वेळ नाही हिंदू महासंघ मात्र ठेवीदारांसाठी सर्वच स्तरावर ठेवीदारांचा लढा पुढे नेण्याचे काम
सातत्याने करीत आहे.नुकत्याच झालेल्या हिंदू महासंघ व ठेवीदारांच्या बैठकीत लोकशाही
ने दिलेल्या हक्कातील मतदानात NOTA चा वापर करायचा निर्णय घेण्यात आला आहे .

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed