EC Notice To Dhananjay Mahadik | लाडक्या बहिणींवर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाचा दणका

Dhananjay Mahadik

कोल्हापूर: EC Notice To Dhananjay Mahadik | “लाडकी बहिणी योजनेचे (Ladki Bahin Yojana) १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचार फेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी रात्री (दि.९) कोल्हापुरात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

लाडक्या बहिणीबाबत वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने महाडिक यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला सात दिवसाच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत विरोधी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान, या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून महाडिकांवर टीका होऊ लागली. त्यामुळे त्यांनी आता माफी मागितली आहे. महाडिकांनी ‘एक्स’ या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ‘माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो.”

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed