ECHS Cards | माजी सैनिकांना ईसीएचएस कार्डच्या मुदतवाढीसाठी 26 एएसचा तपशिल दर्शविणे बंधनकारक

पुणे : ECHS Cards | पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरपिता, वीरमाता, माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबितांना त्यांचे ईसीएचएस कार्डच्या मुदतवाढीसाठी किंवा नवीन कार्ड बनविण्यासाठी पॅन कार्ड व इन्कम टॅक्स संबंधित २६ एएसचा तपशिल पॉलिक्लिनिकमध्ये दर्शविणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
याव्यतिरिक्त ईसीएचएस विवरणमध्ये भ्रमण्ध्वनी क्रमांक बदलणे, पंजीकृत पॉलिक्लिनिक बदलणे आणि इतर पॉलिक्लिनिकमधून रेफरल घेण्याकरिता ऑनलाईन नवीन पीसी पॅच २९ जून रोजी निर्माण करण्यात आलेला आहे. इत्यादी माहिती ऑनलाईन पद्धतीने बदल करण्यासाठी माजी सैनिकांनी जवळच्या पॉलिक्लिनिकला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे एस.डी. (नि.), यांनी केले आहे. (ECHS Cards)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता