Eknath Khadse | ‘भाजपात प्रवेश केला मात्र घोषणाच नाही’, एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने खळबळ; राष्ट्रवादी शरद पवार गटात सक्रिय होणार?
जळगाव : Eknath Khadse | जे पी नड्डा यांच्या (JP Nadda) उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला काही लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच आता भाजपामध्ये राहणे उचित होणार नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच (Sharad Pawar NCP) राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. माझ्या काही अडचणी होत्या. त्या मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितल्या होत्या. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती.
मात्र, भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही.
मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. (Eknath Khadse)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक