Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून मला राज्यपाल पदाची ऑफर’, एकनाथ खडसेंचा दावा; म्हणाले – ‘मुलीची शपथ घेत…’

Eknath Khadse - Devendra Fadnavis

मुंबई: Eknath Khadse On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.यासाठी मनापासून प्रयत्न करेन म्हणत फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिले होते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्याने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे देखील एकनाथ खडसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Eknath Khadse On Devendra Fadnavis)

एकनाथ खडसे म्हणाले, “मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होतो. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही.

मी म्हंटलो राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिले होते. साधारण ही गोष्ट २०१९ सालातील आहे.” असे खडसे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मी प्रवेश घेतो असं कधी म्हणालो नव्हतो. मला प्रवेश घ्या असे म्हणाले होते.
त्यानंतर मी शरद पवार आणि जयंत पाटलांशी चर्चा करुन गेलो होतो.
४० वर्षे भाजपचे काम केले. इतके वर्ष काम केले, पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
इतकं सगळ करून भाजपमध्ये मला प्रवेश द्या, ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे. यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आपण फुली मारलीय “, असंही खडसे म्हणाले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला टोला

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed