Eknath Khadse On Mahayuti Govt | ‘महाविकास आघाडीचं सरकार यावं, महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही’, एकनाथ खडसेंचे वक्तव्य चर्चेत

Eknath Khadse

जळगाव: Eknath Khadse On Mahayuti Govt | आगामी निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी सुरु केलेली आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भाजपामध्ये (BJP) जाण्याची माझी इच्छा होती. माझ्या काही अडचणी होत्या. त्या मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितल्या होत्या. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल, असा इशारा मागील काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिला होता.

भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र, भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसे यांनी म्हटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले.

त्यांतर आता पुन्हा एकदा खडसे यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. मागच्या काही दिवसांतील, काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही. महायुती सरकार आल्याच्या पासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे.

सूडबुद्धीने ईडी सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत.
उट्टे काढण्याचे काम करत असल्याने जनतेची कामं होत नाहीत.
लाडकी बहीण योजनेला ४६ हजार कोटी द्या आणि त्यासोबतच ४६ हजार कोटी रुपये धरणे,
रस्ते निर्मितीसाठी द्या म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल.

त्यामुळं हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे,
असे आपल्याला वारंवार वाटत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
त्यांच्या या वक्तव्याने महायुतीतील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed