Eknath Shinde | ठाकरेंनंतर आता भाजपाकडे मोर्चा? शिंदेंचे राजकीय डावपेच सुरु, ठाणे विधानसभेची जागा परत मिळवण्याच्या हालचाली?
ठाणे : Eknath Shinde | एकनाथ शिंदे हे कसलेले राजकीय नेते असल्यानेच त्यांनी शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षात बंडखोरी करत सुरूंग लावला होता. यानंतर ते थेट मुख्यमंत्री पदावर बसले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपा आणि अजित पवारांच्या गटापेक्षा चांगली कामगिरी केली, तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेला देखील शह दिला. आता विधानसभेसाठी शिंदे यांनी कंबर कसली असून ठाणे विधानसभेच्या जागेसाठी भाजपाकडेच आपला मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. (Thane Vidhan Sabha)
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्षा कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबई, ठाण्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पुरेपुर श्रेय आपल्या पक्षाकडे खेचून घेतले आहे. तसेच शिंदेसेनेने आता ठाणे विधानसभेवर दावा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. (Eknath Shinde)
ठाणे विधानसभेची जागा मिळवण्यासाठी शिंदेसेनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकेकाळी ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो पुन्हा मिळवण्यासाठी शिंदे यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभेत शिंदेसेनेचे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. यावेळी त्यांना ठाणे विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. या विधानसभा मतदार संघात म्हस्के यांना मिळालेले मताधिक्क्य हे शिवसेनेचे असल्याचा दावा शिंदेसेनेने सुरु केला आहे. या माध्यमातून भाजपवर दबाव टाकला जात आहे.
विशेष म्हणजे, ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या पक्षाने लोकसभेच्या दोन जागा लढवल्या.
या दोन्ही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार विजयी झाल्याने ठाण्यात शिंदे यांची ताकद वाढली आहे,
त्यामुळे विधानसभेसाठी त्यांच्या ठाण्यावरील दाव्याला मजबुती आली आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघात येत असलेल्या विधानसभेच्या ६ पैकी कोपरी,
पाचपाखाडी आणि ओवळा, माजिवाड्यात शिंदेसेनेचे आमदार आहेत.
मात्र, ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे. संजय केळकर हे ठाण्याचे आमदार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडे असलेला हा मतदार संघ घेण्यासाठी शिवसेनेने पद्धतशीरपणे पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. या भागात विविध विकासकामे करण्यावर देखील शिंदेंसेनेचा जास्त भर राहिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uttam Nagar Pune Crime News | पुणे: 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल,
आरोपी गजाआड
Pune Crime News | पुणे: अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ, तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल