Eknath Shinde News | “ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य
मुंबई: Eknath Shinde News | विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल हाती येत आहेत. महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळताना दिसत आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने (BJP) १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) ५७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अजित पवारांची (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहेत.
सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणेही कठीण झाल्याचे चित्र आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला २९ जागा निवडून येणे आवश्यक असते.
दरम्यान आता महायुती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. भाजपला अधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे भाजप नेते म्हणत आहेत. याबाबत आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ” मुख्यमंत्रिपदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री
असं ठरलेलं नाही. सर्व आकडे येऊदे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसू आणि निर्णय घेऊ.
जसं आम्ही एकजूट होऊन निवडणूक लढलो. तसेच आम्ही त्यावरही एकत्र, एकजुटीने निर्णय घेऊ”, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट