Eknath Shinde News | नाराजीनाट्यातून एकनाथ शिंदे गावी गेले? गृहखात्यावरून महायुतीत वादंग? स्वतःच दिले स्पष्टीकरण; म्हणाले – ‘या सर्व गोष्टीबाबत…’

Eknath Shinde

सातारा : Eknath Shinde News | विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) जाहीर होऊन आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री पदी कोण असणार? याबाबत घोषणा झालेली नाही. मात्र दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे संकेत देण्यात आले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे (Mahayuti Govt) राज्याचे गृह व महसूलमंत्रिपद मागितल्याची चर्चा आहे. त्याबाबत त्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच शिंदे आपल्या दरे गावी गेल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ” सरकार स्थापन करताना गावाला यायचं नाही? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुकीत एवढे दौरे आणि प्रचार झाले. आम्ही महायुती मोठ्या मताधिक्यांनी निवडणूक जिंकलो. मी नेहमी सांगायचो की जनता आम्हाला कामाची पावती देईल. आमचं सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार होते. मीदेखील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. त्यामुळे मी गावी येत असतो, मला गावी आल्यानंतर आनंद मिळतो.”

शिवसेनेला गृहखातं पाहिजे का? या प्रश्नावर बोलताना ते पुढे म्हणाले, ” या सर्व गोष्टीबाबत चर्चा होईल. चर्चामधून अनेक गोष्टी निघतील. तसेच अनेक गोष्टी त्यामधून सुटतील. आम्हाला जे लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्या लोकांना आम्ही जी आश्वासने दिलेली आहेत. आम्हाला लोकांची बांधीलकी जपायची आहे. त्यामुळे आम्हाला आणि त्यांना काय मिळणार हे महत्वाचं नसून आम्हाला लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करत आहोत”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. (Eknath Shinde News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed