Eknath Shinde News | एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, पण…’

eknath shinde

मुंबई : Eknath Shinde News | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे.

निवडणुकीनंतर सत्ता कोणाकडे जाणार ? मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. राजकीय जाणकार याबाबत विविध तर्क लावताना दिसून येत आहेत.

महायुतीतून मुख्यमंत्री पदासाठी अनेक चेहरे समोर आहेत. अशातच “मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, पण मुख्यमंत्री महायुतीचाच होणार”, असे मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हे भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ” बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे की मी माझ्या पक्षाचा काँग्रेस (Congress) कधीच होऊन देणार नाही. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेससोबत गेले. आपल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असे त्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. (Eknath Shinde News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed