Eknath Shinde News | केंद्रीय मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाही तर अजित पवारांबाबरोबर सरकार बनवा’

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis

मुंबई: Eknath Shinde News | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले. यामध्ये भाजपला (BJP) १३२, शिवसेनेला (Shivsena Shinde Group) ५७ तर अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) ४१ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. (Who Will Next CM Of Maharashtra)

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर असावेत, यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात आहे. तर शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केंद्रातून केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचे खळबळजनक विधान समोर आले आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन पावले मागे येऊन केंद्रात मंत्री होण्याचा सल्ला दिला आहे.

रामदास आठवले म्हणाले, ” महायुतीच्या विजयात एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा होता. लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहीजे. मात्र भाजपाकडे प्रचंड जागा आहेत. त्यामुळे भाजपा काही ऐकणार नाही. ज्याप्रमाणे २०२२ साली देवेंद्र फडणवीस चार पावले मागे आले होते. त्याप्रमाणे आता शिंदे यांनी दोन पावले मागे येण्याची आवश्यकता आहे.”

ते पुढे म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे, त्यांना केंद्रात आणा. जर ते ऐकलेच नाहीत तर भाजपाने शिवसेनेला बाजुला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे. एकनाथ शिंदे यांनी एकतर उपमुख्यमंत्रीपद घ्यावे किंवा त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे नसेल तर त्यांनी केंद्रात येऊन मंत्रीपद घ्यावे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा नक्कीच त्यांचा विचार करतील. पण त्यांनी नाराजी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहीजे”, असे आठवले यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed