Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट संकेत; दोन टप्प्यात निवडणुका होणार?

Eknath Shinde

मुंबई : Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत तयारीला लागले आहेत. मात्र निवडणुका कधी जाहीर होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात होईल, असे संकेत दिले. २०१९ मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली होती. ती एकाच टप्प्यात झालेली होती. महाराष्ट्र, हरियाणात एकाच वेळी निवडणूक झाली.

पण यंदा हरियाणामध्ये आधी निवडणूक होत आहे. तर महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच याबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

२००४ पासून राज्यात विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. चारही वेळा एकाच टप्प्यात मतदान झाले.
१९९९ मध्ये मात्र विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात झाली होती. ५ आणि ११ सप्टेंबरला मतदान पार पडले होते.
ही निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत झालेली होती. या निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट झाला होता. (Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed