Eknath Shinde On Mahavikas Aghadi | ‘पराभवाच्या भीतीने महाराजांवरून राजकारण’, मविआच्या जोडो मारो आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल, म्हणाले – ” त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय”
मुंबई : Eknath Shinde On Mahavikas Aghadi | राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed). दरम्यान महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात ‘जोडे मारो आंदोलना’ची हाक दिली आहे (MVA Jode Maro Andolan). गेटवे ऑफ इंडिया जवळील (Gateway Of India Mumbai) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नको आहे. महाराष्ट्र मध्ये दंगली व्हाव्यात, जाती जातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण महाराष्ट्रातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे. म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून आरक्षण जाणार, संविधान बदलणार, हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये दहशत, भीती पसरवून मतं मिळवली. पण माणूस एकदा फसतो. पुन्हा पुन्हा फसत नाही”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे.
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजना सुपरहिट झाली आहे. गावागावात शहराशहरात खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोहोचली आहे. दुर्देव बघा. एक काँग्रेसचा माणूस अनिल वडपल्लीवार कोर्टात आडवा झाला आहे. तो कुणाचा कार्यकर्ता आहे. कुणाचा पोलिंग एजंट आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने हायकोर्टातही याचिका केली. ती कोर्टाने फेटाळली. आता नागपूरला याचिका केली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का? नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं.
कंगना राणौतचे घर तोडलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कितीतरी महिलांवर अन्याय केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये”,
असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Eknath Shinde On Mahavikas Aghadi)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद