Eknath Shinde On Mahavikas Aghadi | “मी सामान्य घरातला मुलगा,आईची काटकसर बघितलेला”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना…”

Eknath Shinde

आळंदी : Eknath Shinde On Mahavikas Aghadi | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आळंदी (Alandi) दौऱ्यावर आहेत. वारकरी संप्रदायातील मानबिंदू शांती ब्रह्म ह. भ. प मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या ९९ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी मारोती महाराज कुरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शांतिब्रह्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला.

“महाराष्ट्र ही संतांची भूमी.कुरेकर बाबा आणि ढोक महाराजांचे अभिनंदन. यायला उशीर झाला त्याबद्दल त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम आयुष्यातला सगळ्यात आनंद देणारा आहे. संताचे पूजन यापेक्षा दुसरं भाग्य काय असतं.

राजकीय अधिष्ठानापेक्षा संतांचे अधिष्ठान मोठे आहे. ते समाज घडवण्याचे काम करतात. धर्मवीर आनंद दिघेही (Anand Dighe) प्रत्येक हरिनाम सप्त्याला न चुकता जायचे,” अशी आठवण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अनेक वर्षापासून बंद पडलेले प्रकल्प सुरू केले. शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा अशा अनेक योजना आणल्या. २ वर्षात मी काय काय करायचे. एकनाथ शिंदेला थोडा तरी टाईम देणार का नाही? एकनाथ शिंदे खोटा बोलत नाही. बाळासाहेब ठाकरे सांगायचे शब्द देण्याआधी १० वेळा विचार करा. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळतो.

लाडकी बहिण योजनेसाठी पुढील १ वर्षाची तरतूद केलेली आहे. ही ओवाळणी कायम मिळेल. माझ्याकडे कुणी काम घेऊन आला तर त्यांचं विदाऊट फी काम करतो. एव्हढीच अपेक्षा आहे की माझ्याकडे आलेला एकही व्यक्ती खाली हात जाऊ नये. शपथविधीला देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र होतो तो देखील इतिहास घडला. असा इतिहास घडवायला धाडस लागतं, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, “आम्ही आजपर्यंत ६०० निर्णय घेतले, अनेक निर्णय माझ्या लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरु केली.
एखादी योजना लगेच सुरू करता येत नाही त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. मी सामान्य घरातला मुलगा आहे. (Ladki Bahin Yojana)

आईची काटकसर बघितलेला मुलगा आहे. काही लोक १५०० रुपयात विकत घेता का? लाच घेता का? असं म्हणतात.
पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना १५०० ची काय किंमत,”
असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Eknath Shinde On Mahavikas Aghadi)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed