Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

Eknath Shinde-Uddhav Thackeray

यवतमाळ : Eknath Shinde On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) सामोरे जात असताना महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नावावरूनही चर्चा होत असताना निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री कोण पाहुयात अशी काँग्रेस (Maharashtra Congress) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची (Sharad Pawar NCP) भूमिका आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या, कोणाच्या जास्त जागा येतात त्यावरून पुढे ठरवूयात अशी प्रतिक्रिया दिली होती.

यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “किमान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतो अशी चर्चा तरी ठेवा असं पत्रकारांशी काहीजण बोलले. एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे लोक लावतात. एका माणसाला किती चेहरे असतात ते माझ्यापेक्षा कुणी ओळखू शकत नाही. ज्या आघाडीतल्या मित्रपक्षांनाही तुमचा चेहरा नकोसा झालाय त्याला जनता कशी स्वीकारेल”, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. यवतमाळ येथील कार्यक्रमात शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, आज ज्या रितीने राजकारण करत आहेत त्यांना उठता बसता, झोपतानाही एकनाथ शिंदे, महायुती सरकार आठवतंय. तुमच्या पोटात का दुखतंय, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून, गरीब कुटुंबातील आहे म्हणून, सोन्याचा चमचा घेतलेल्यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे का?

आम्ही २४ तास काम करतोय. मी पहाटेपर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे पासून कामाला सुरुवात करतात आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण दिवसभर काम करतात असं २४ बाय ७ सरकार काम करतंय असं त्यांनी सांगितले. तसेच माझ्या बहिणींना विनंती आहे, हे खोटेनाटे लोक आले तर त्यांना विचारा, तुम्ही आमच्यासाठी काय केले. तुमचे सरकार होतं तेव्हा काही दिले नाही.

५०-६० वर्षात कधी काँग्रेसला सुचलं? स्वतः राजीव गांधी म्हणाले होते केंद्राने १ रुपया दिला तर सामान्य जनतेपर्यंत पोहोचेपर्यंत ते १५ पैसे होतात म्हणजे ८५ टक्के भ्रष्टाचार होत होता. आम्ही १५०० रुपये महिन्याला देतोय जर दुसरं सरकार असतं तर हातात ४०० रुपयेच पडले असते. आम्ही पूर्ण पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर दिले. तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठिशी कायम ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरम्यान, आज बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जास्त आनंद मिळतो.
जेव्हा मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यापेक्षा जास्त आनंद बहिणींकडे पाहून होतो.
आमचं सरकार देणारे आहे घेणारे नाही. या योजना कायमस्वरुपी राहतील. (Ladki Bahin Yojana)

ही योजना बंद करायला विरोधक कोर्टात गेले. का आमच्या बहिणींसाठी मिळणारे पैसे थांबवता,
तुमच्या छातीत धडकी भरते का? गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्यांना तुम्ही उभं करणार का?
असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला. (Eknath Shinde On Uddhav Thackeray)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव

You may have missed