Eknath Shinde On Uddhav Thackeray | ” मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
मुंबई : Eknath Shinde On Uddhav Thackeray | राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Resevation) प्रश्न ऐरणीवर आला आहे. दि. २९ रोजी मराठा आंदोलक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर गेले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ते कार्यकर्ते मोर्चा घेऊन पुन्हा मातोश्रीवर गेले.
त्यानंतर मराठा आंदोलक आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. ” केंद्रसरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा मी आमच्या पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भेटीसाठी पाठवणार आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना आश्वासन दिले.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, ” उद्धव ठाकरे स्वतःवर काहीही घ्यायचं नाही. केवळ दुसऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळं व्हायचं आहे. महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार असताना ते राज्याचे मुख्यमंत्री होते. महाविकास आघाडीचं सरकार ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
त्याआधी सरकारने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मी त्यावेळी फडणवीसांबरोबर होतो. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं. मात्र महाविकास आघाडी ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू शकली नाही. हे त्यांचं अपयश आहे.
आता महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं. लोकांच्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, मराठा समाजातील अनेक कुटुंबांच्या कुणबी नोंदी आपल्या सरकारने शोधल्या. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली. आता मराठा समाजातील अनेक कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडू लागल्या आहेत.
त्यामुळे आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. १० टक्के आरक्षण देऊन आम्ही तसा निर्णय देखील घेतला आहे. अजूनही मराठा समाजातील कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्रं देण्याचे काम चालू आहे.
ते पुढे म्हणाले, ” आम्ही मराठा समाजासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत.
मात्र त्यांना दोन समाजात तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे.
मात्र हे दोन समाज (मराठा व ओबीसी) सुज्ञ आहेत.
आरक्षण देणारं सरकार कोणाचं आणि या प्रकरणातून पळवाट शोधणारं सरकार कोणाचं, हे या दोन्ही समाजांना चांगलंच ठाऊक आहे.
अलीकडेच आम्ही मराठा आरक्षणप्रश्नी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.
उद्धव ठाकरे त्याठिकाणी आले नव्हते. या बैठका टाळणे आणि दोन समाजामध्ये अशीच भांडणे लावून महाराष्ट्र पेटत राहावा,
त्यातून त्यांची राजकीय पोळी भाजली जावी, अशी त्यांची वृत्ती आहे.
परंतु, मराठा व ओबीसी समाज त्याला बळी पडणार नाही असे मला वाटते,” असेही शिंदे म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश