Eknath Shinde On Uddhav Thackeray | बंडाच्या वेळी उद्धव ठाकरेंकडून धमक्या; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट, म्हणाले – “लपून-छपून गुवाहाटीला गेलो नाही, ठाकरेंचा फोन…”
मुंबई: Eknath Shinde On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून पक्षांकडून रणनीती ठरवली जात आहे. दोन पक्ष फुटल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या बंडावर भाष्य केले आहे. दोन वर्षांपूर्वी गुवाहाटीला जात असताना आपण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गेलो असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. (Eknath Shinde On Uddhav Thackeray)
आम्ही गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती. मी लपून-छपून गुवाहाटीला गेलो नाही, मी खुलेआमपणे गुवाहाटीला गेलो. उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. मी रस्त्यात होतो. त्यांच्याबरोबर फोनवर बोलत-बोलत गेलो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, ” त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मला खूप आव्हान दिलं होतं की, परत येऊन दाखवा. लाखो लोक रस्त्यावर येणार, रस्ता जाम करणार. आमदारांना विधानसभेत जाऊ देणार नाही, अशा धमक्याही आम्हाला त्यांनी दिल्या होत्या.
त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, मी सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. ज्याने पक्षासाठी दिवसरात्र काम केलं आहे त्याला तुम्ही घाबरवत आहात, मी घाबरणाऱ्यांमधील नाही”, असंही शिंदे म्हणाले.
अनिल देशमुख गृहमंत्री असताना भ्रष्टाचार उघडपणे सुरू होता. मी हे मुख्यमंत्री आणि अजित पवारांनाही सांगितले होते. गृह विभाग हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारा विभाग आहे. मात्र तो भ्रष्टाचार सुरूच होता त्याची भरपाई देशमुखांना करावी लागली.
मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना बोलायला हवं होतं. आमचे कार्यकर्ते जेलला जात होते.
आमदारांना मतदारसंघात काम करता येत नव्हते. विचारधारेला फटका बसत होता.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काही बोलले त्यावेळी मौन बाळगावं लागत होते.
आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे करत असलो तरी दुसऱ्या धर्म जातीचा अपमान केला नाही.
मात्र आमच्या विचारधारेला तोडमोड करण्याचे काम महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) होत होते.
त्यामुळे आमदार चिंतेत होते. शरद पवारांनी स्वतः त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य