Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून…’
मुंबई: Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुंबईत आयोजित केलेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘यापुढे राजकारणात एक तर तू राहशील, नाहीतर मी राहील’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाष्य करत त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय. घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही. राज्यात सुरु असलेल्या विकासामुळं विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे , अशी टीका शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ” महायुतीच्या (Mahayuti) काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू झाली. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) अडीच वर्षे आणि आमच्या महायुतीच्या सरकारची दोन वर्षे यांची तुलना करता लोकांना समजेल. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच पातळी सोडून टीका केली जाते.
एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतो. घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही. आम्ही फिल्डवर उतरतो आणि काम करतो. त्यामुळे लोकांची पसंती आम्हालाच आहे. येत्या काळात राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे ‘, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
” गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की,
माझे सगळे नातेवाईक माझ्यासमोर आहेत. यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का?
कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत.
अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसांचे डाव होते.
हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन”,
असे उद्धव ठाकरे फडणवीसांना उद्देशून म्हणाले होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune News | दोन वर्षाचा आमोद पावसाच्या पाण्यात बुडाला; डॉक्टरांनी ‘सीपीआर’ दिला अन् तो वाचला!
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर