Eknath Shinde On Uddhav Thackeray | ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंकडून निशाणा; म्हणाले – ‘सरडे रंग बदलतात मात्र एवढ्या वेगाने …’
मुंबई : Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाची जवळीक वाढताना दिसत आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली . तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ” स्वार्थासाठी महाविकास आघाडी एकत्र आली होती. लोकसभेत फेक नरेटिव्ह सेट केला आणि लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला. नागरिकांनी विधानसभेला त्यांना त्यांची जागा दाखवली. अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो, मला शिव्या शाप आणि आरोप करण्याशिवाय त्यांनी दुसरे काही केले नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. तू राहशील नाही तर मी तरी राहिन,
असे बोलले, मात्र आता काय जादू झाली ते आपण पाहिलंय, सरडे रंग बदलतात मात्र एवढ्या फास्ट बदलणारे मी पाहिले नाहीत”,
असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. (Eknath Shinde On Uddhav Thackeray)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका