Eknath Shinde | ‘विधानसभेला उमेदवारासाठी स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष’,मुख्यमंत्री शिंदेनी सांगितला फॉर्म्युला

मुंबई : Eknath Shinde | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटप (Mahayuti Seat Sharing Formula) लोकसभेतील स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल ,असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये होईल अशी अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले. वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यावेळी त्यांनी भाष्य केले. शिंदे सेनेचा स्ट्राइक रेट चांगला होता. त्यांनी १५ जागा लढवल्या आणि ७ जिंकल्या होत्या. (Shivsena Shinde Group)
राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणि अन्य योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार येईल, राज्य आर्थिक संकटात सापडेल हा विरोधकांचा खोडसाळ प्रचार आहे. आमच्या योजनांना नावे ठेवणारे विरोधक खटाखट पैसे कुठून आणणार होते, असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला असलेल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात किंवा मिळतील अशी शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता हा निकष सुद्धा आम्ही विचारात घेत आहोत. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल असे ते म्हणाले. (Eknath Shinde)
विधानसभेचा उमेदवार निवडताना महायुतीतील तीनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा व उमेदवारी दिली जाईल,
असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारे जागावाटप आणि उमेदवार ठरवल्याने फटका बसल्याची चर्चा होती.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली