Eknath Shinde To Amit Shah | “आमच्याकडं हिंदुत्ववादी मतं, मात्र ठाकरेंचा सामना…” मुख्यमंत्री शिंदेंची अमित शहांकडे मागणी; म्हणाले…
मुंबई: Eknath Shinde To Amit Shah | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीतील जागावाटपावरुन सुरु असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde To Amit Shah)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर (Amit Shah Mumbai Tour) असताना शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) त्यांच्याकडे १०० हुन अधिक जागांची मागणी केली आहे. यावेळी शहांच्या समोर लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबद्दल तसेच अखंड शिवसेनेच्या परफॉर्मन्सबद्दल सादरीकरण करण्यात आल्याचीही माहिती आहे.
आम्ही मराठी आणि हिंदुत्ववादी मतं टिकवून ठेवली आहेत. तर शिवसेना ठाकरे पक्षाला स्वतःची फारशी मतं मिळाली नाहीत. इंडिया आघाडीसाठी धोरणात्मक मतदान झाल्यामुळे त्यांना मते मिळाली. १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तरच आम्ही ठाकरे गटाचा सामना करु आणि महाविकास आघाडीला पराभूत करु शकतो, असेही शिंदेंनी शहांना सांगितल्याची माहिती आहे.
दरम्यान आता महायुतीतील जागावाटपावरुन (Mahayuti Seat Sharing Formula)
सुरु असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
कारण शिवसेनेने एकूण २८८ जागांपैकी १०० ते १०५ जागांवर दावा केला आहे,
तर भाजप १६० मतदारसंघात उमेदवार उभे करुन २०१९ पेक्षा अधिक जागा जिंकण्यास उत्सुक आहे.
तर ६० ते ८० जागा जिंकण्याचे राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) लक्ष आहे.
ही स्थिती पाहता ४० ते ५० जागांवर दोन पक्षांत किंवा तिन्ही पक्षांत रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
