Eknath Shinde Vs Ajit Pawar | ‘फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही’ ; महायुतीत फायलींवरून धुसफूस; शिंदे-पवार मंत्रिमंडळ बैठकीतच भिडले?
मुंबई : Eknath Shinde Vs Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली आहे. दरम्यान महायुतीत (Mahayuti) धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. फाईलींवर सह्या करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी मंत्र्यांच्या व आमदारांच्या फाईलींची मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवणूक होत असल्याचे समोर आल्यानंतर अजित पवारांनीही नगरविकास खात्याची फाईल संपूर्ण वाचल्याशिवाय सही करणार नसल्याची भूमिका घेतल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सही विना अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. आता याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत दिसून येत आहेत. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत आहे.
फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने मंत्रिमंडळ बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही,
अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली.
त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मी सुद्धा सही करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याने बैठकीत शांतता पसरली होती.
राष्ट्रवादी मंत्र्यांच्या व आमदारांच्या फाईलींची मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवणूक होत
असल्याचे समोर आल्यानंतर अजित पवारांनीही नगरविकास खात्याची फाईल संपूर्ण वाचल्याशिवाय सही करणार
नसल्याची भूमिका घेतल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा