Election Commission Invites Congress | निवडणूक आयोगाकडून पक्षाच्या प्रतिनिधींना समोरासमोर चर्चा करण्याचे निमंत्रण; निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्याचा दावा

मुंबई : Election Commission Invites Congress | विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. विधानसभेच्या २८८ जागांपैकी महायुतीला (Mahayuti) २३० पेक्षा अधिक जागा मिळाल्या. दरम्यान विरोधकांनी या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Maharashtra Assembly Election Results 2024)
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शक होत्या, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याबाबत काँग्रेसने नोंदवलेल्या सर्व वैध तक्रारींचा योग्य आढावा घेतला जाईल, असे आश्वासनही आयोगाने दिले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला. यावर आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधींना ३ डिसेंबर रोजी सर्व तक्रारींवर चर्चा करण्यासाठी बोलवले आहे.
या निवडणुकीतील प्रक्रियांसह आकडेवारीवर आक्षेप नोंदवून काँग्रेसने ही आकडेवारी विसंगत असल्याचे म्हटले होते. याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्यात आले होते. याबाबत पुरावे सादर करण्यासाठी समोरासमोर सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. यावर निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता होती, असे स्पष्ट केले. या प्रत्येक टप्प्यात उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता, असे आयोगाने नमुद केले आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या सहभागाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची एक पारदर्शक प्रक्रिया झाली होती.
मतदानाच्या आकडेवारीत कोणत्याही प्रकारचे घोळ नाहीत.
सर्व उमेदवारांची प्रत्येक मतदान केंद्रांवरील आकडेवारी उपलब्ध असून त्याची पडताळणीही झाली आहे.
अंतिम आकडेवारीत फरक दिसतो, कारण संबंधित पीठासीन अधिकारी ही आकडेवारी अंतिम करण्यापूर्वी अनेक कायदेशीर
कर्तव्याचे पालन करुन प्रक्रिया पूर्ण करीत असतात, असे आयोगाने म्हंटले आहे. (Election Commission Invites Congress)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी