Elections Of Cooperative Societies In Maharashtra | राज्यातील 28 हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित; शासनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतरच निवडणुका शक्य
पुणे : Elections Of Cooperative Societies In Maharashtra | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस आत्तापर्यंत तीन वेळा स्थगिती मिळाल्याने जवळपास ८ महिन्यांहून अधिक काळ सुमारे २८ हजार ८३७ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित राहिलेल्या आहेत.
विधानसभा निवडणुका झाल्याने या संस्थांच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी शासनास पाठविला आहे. शासनाने त्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.
त्यामुळे सध्यातरी या निवडणुकांसाठी सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या असून, विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्याने या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक प्राधिकरण आग्रही आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यान्वये समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आणि तिच्या पदाधिकाऱ्यांचा पदावधी निवडणुकीच्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत असेल आणि पदाधिकाऱ्यांच्या मुदत समितीच्या मुदतीइतकीच असेल अशी तरतूद आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाद्वारे प्रत्येक संस्थेच्या समितीची निवडणूक घेण्यात येईल, अशी तरतूद आहे.
मात्र, निवडणुका प्रलंबित राहिल्याने मुदत संपूनही विद्यमान संचालक मंडळे दीर्घकाळापासून कार्यरत राहिलेली आहेत.
त्यामुळे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार संचालक मंडळाच्या पाच वर्षांच्या मुदतीचे पालन होत नाही.
लोकशाही तत्त्वाचा विचार करता सहकारी संस्थांच्या निवडणुका दिलेल्या मुदतीत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
शासनस्तरावरून सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत उचित आदेश निर्गमित करण्याचा प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे
यांनी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना २७ नोव्हेंबर रोजी पाठविला आहे.
जेणेकरून लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सहकारी संस्थांमध्ये नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल.
त्यामुळे शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा राज्यातील संबंधित सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी