EPF Interest | PF खातेधारकांना लवकरच मिळणार खुशखबर, अकाऊंटमध्ये केव्हा येणार व्याजाचे पैसे?

EPFO

नवी दिल्ली : EPF Interest | जर तुम्ही सुद्धा पगारदार वर्गातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) कडून फेब्रुवारी २०२४ मध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रॉव्हि‍डेंट फंड (Provident Fund) वरील व्याजदर वाढविण्याची घोषणा केली होती. ईपीएफओ (EPFO) ने मागील वर्षाचे ८.१५% व्याजदर २०२३-२४ साठी वाढून ८.२५% केला.

परंतु, अजूनपर्यंत सरकारकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ चे ईपीएफ व्याज देण्यात आलेले नाही. अनेक लोकांना हे व्याज कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे.

मागील काही दिवसांपूर्वी एका ईपीएफ मेंबरने एक्सवर थकीत व्याजाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ईपीएफओने म्हटले होते की व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवरकच तुमचे पैसे खात्यात दिसू शकतात. (EPF Interest)

जेव्हा हे व्याज खात्यात भरले जाईल, त्याची रक्कम एकदाच पूर्ण भरली जाईल.
व्याजाबाबत कोणतेही नुकसान होणार नाही. सूत्रांचे म्हणणे आहे
की, सरकार ईपीएफवर मिळणारे व्याज अर्थसंकल्पानंतर म्हणजे २३ जुलैनंतर ट्रान्सफर करू शकते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed