EPFO Early Pension Rule | निवृत्तीच्या आधीही घेऊ शकता का पेन्शन? काय सांगतो नियम

नवी दिल्ली : EPFO Early Pension Rule | नोकरी करणारे कर्मचारी दर महिन्याला आपल्या पगारातील ठराविक रक्कमेचे ईपीएफओमध्ये योगदान देतात. ईपीएफओमध्ये निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो. जेव्हा सदस्याचे वय 58 वर्ष होते तेव्हा ईपीएफओच्या नियमानुसार तो पेन्शन घेऊ शकतो. पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओ सदस्याला 10 वर्षे सातत्याने योगदान द्यावे लागते.
पेन्शनची गणना योगदान रक्कमेसह सेवेच्या आधारावर केली जाते. ईपीएओ आपल्या सदस्याला अर्ली पेन्शन चा ऑपशन सुद्धा देते. म्हणजेच सदस्य 58 वर्षापूवी सुद्धा पेन्शनचा लाभ घेऊ शकतो.
अर्ली पेन्शनचे नियम
ईपीएफओच्या नियमानुसार, 50 वर्षापासून 58 वर्षाच्या दरम्यानचे कर्मचारी अर्ली पेन्शन ऑपशन सिलेक्ट करू शकतात. 58 वर्षापूर्वी पेन्शन घेतल्यास पेन्शन रक्कम कमी होते. नियमानुसार 58 वर्षापूर्वी जितकी वर्षे आधी पेन्शनचे पैसे काढाल, तुम्हाला प्रत्येक वर्षी 4 टक्के दराने पेन्शन कमी होऊन मिळेल.
अशावेळी समजून घ्या की, तुम्ही 56 व्या वर्षी अर्ली पेन्शनसाठी क्लेम केला तर तुम्हाला केवळ मुळ पेन्शन रक्कमेच्या 92 टक्के भागच पेन्शन मिळेल. दरवर्षी 4 टक्के भाग म्हणजे 2 वर्षात 8 टक्के भाग कमी होऊन मिळेल.
60 व्या वर्षी वाढून मिळेल पेन्शन
जर कर्मचार्याने 58 वर्षानंतर सुद्धा पेन्शनचा लाभ घेतला नाही आणि 60 व्या वर्षानंतर पेन्शन घेतली तर त्यास पेन्शन वाढून मिळेल. ईपीएफओच्या नियमानुसार एखादा कर्मचारी 58 वर्षानंतर दोन वर्षापर्यंत पेन्शन रोखत असेल तर त्यास दरवर्षी 4 टक्के दराने अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जातो. म्हणजे 60 वर्षाच्या वयात त्यास 8 टक्के जास्त दराने पेन्शन मिळते.
पेन्शन फंडातून काढू शकता पैसे
जर तुम्ही 10 वर्षापेक्षा कमी काळासाठी ईपीएओमध्ये योगदान केले असेल तर तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार नाही. अशावेळी तुम्ही पुढे नोकरी करण्यास इच्छूक नाही तेव्हा तुम्ही पेन्शन फंडातून पुर्ण रक्कम काढू शकता.
जर तुम्ही भविष्यात पुन्हा नोकरी करू लागलात तर पेन्शन स्कीम सर्टिफिकेट घेऊ शकता.
पुन्हा नोकरी सुरू केल्यास या सर्टिफिकेटच्या मदतीने मागील पेन्शन अकाऊंट नवीन नोकरीचे अकाऊंट लिंक करावे.
यामुळे नोकरीचा दहा वर्षाचा कालावधी कमी होईल आणि तुम्हाला पेन्शनचा अधिकारही मिळेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार