Excise Department Constable Job | उत्पादन शुल्कच्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू ; प्रचंड खळबळ

झारखंड : Excise Department Constable Job | झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उत्पादन शुल्कच्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत ११ उमेदवारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल पदासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी २२ ऑगस्ट रोजी झारखंडमधील सात केंद्रांवर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. दुर्दैवाने शारीरिक धावण्याच्या चाचण्यांदरम्यान ११ उमेदवारांचा मृत्यू झाला आहे.
पलामूमध्ये ४, गिरीडीह आणि हजारीबागमध्ये प्रत्येकी २ आणि रांची, पूर्व सिंगभूम आणि साहिबगंजमध्ये प्रत्येकी १ तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. याबाबतची माहिती ऑपरेशन विभागाचे महासंचालक अमोल होमकर यांनी दिली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस प्रवक्ते अमोल व्ही होमकर म्हणाले की, शारीरिक निवड प्रक्रियेत आतापर्यंत १,२७,७३२ उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यात ७८,०२३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांची संख्या ५६,४४१ तर महिला उमेदवारांची संख्या २१,५८२ होती. उमेदवारांच्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.
राज्यातील विरोधी पक्ष भाजपनेही उमेदवारांच्या मृत्यूवरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडले आहे.
या प्रकरणाबाबत राज्यसभा खासदार आदित्य साहू यांनी सरकारच्या नियुक्ती नियमांवर प्रश्न उपस्थित केला
असून मृत उमेदवारांच्या आश्रितांना ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी आणि त्यांना नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत सरकार संवदेनशील असून याबाबत राजकारण करू नये असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (Excise Department Constable Job)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक