Exclude Fursungi And Devachi Uruli From PMC | फुरसंगी – उरूळी देवाची गावे महापालिकेतून वगळली ! स्वतंत्र नगर परिषदेची स्थापनेचा शासनाचा अध्यादेश जारी; कचरा डेपो मात्र महापालिकेकडेच राहाणार

Mantralaya

पुणे : Exclude Fursungi And Devachi Uruli From PMC | महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांपैकी फुरसुंगी आणि उरूळी देवाची ही दोन गावे वगळून या दोन गावांची एकत्रित स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा अध्यादेश आज अखेर शासनाने जाहीर केला. नवीन नगर परिषदेची रितसर रचना होईपर्यंत पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशही नगरविकास विभागाने दिले आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची एकत्रित नगरपरिषद करताना महापालिकेच्या मालकिचे या गावांतील कचरा डेपोचे क्षेत्र वगळण्यात आले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारने (Mahayuti Govt) २०२२ मध्ये महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांपैकी देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा आणि या दोन गावांची मिळून नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला. प्रामुख्याने महापालिकेत या गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर महापालिकेने नजीकच्या हडपसरच्या दरानुसार येथील मिळकतींना कर आकारणी केली. हा कर ग्रामपंचायतीपेक्षा अधिक असल्याचा आरोप करत माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेउन ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची मागणी केली होती. या बैठकीतच शिंदे यांनी स्वतंत्र नगर परिषद करण्याची घोषणा केली होती. ३१ मार्च २०२३ ला शासनाने प्रत्यक्षात ही गावे वगळण्यासाठी अधिसूचना काढून इरादा जाहीर केला. यानंतर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली होती.

फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावातील वगळलेला भाग

फुरसुंगीमधील स.नं.१९३, १९२, १९४ व १९५ पैकी काही कचरा डेपोचा भाग, उरूळी देवाची मधील स.नं.३०, ३१ व ३२ मधील कचरा डेपोचा भाग हा महापालिकेच्या मालकिचा असून पुणे शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी हा भाग पुणे महापालिकेतच राहाणार आहे.

अशी असेल फुरसुंगी – देवाची उरूळी नगर परिषदेची हद्द

पुर्व दिशेला लोणीकाळभोर गावाची शिव, पश्‍चिमेला औताडेवाडी, वडाचीवाडी व हडपसरची शीव, दक्षिणेला वडकी आणि शेळकरवाडीची गावाची शीव आणि उत्तरेला हडपसर, शेवाळेवाडी आणि लोणी काळभोर गावाची शीव.

टी.पी.स्किम नगर परिषदेकडे जाणार

महापालिकेने फुरसुंगी आणि देवाची उरूळी मध्ये पाच टी.पी.स्किमची आखणी केली आहे.
यापैकी देवाची उरूळी येथील सुमारे ७०० एकरवरील दोन टी.पी.स्किमचे (TP Scheme Pune) काम अंतिम टप्प्यात आहे.
या टी.पी.स्किम देखिल नगर परिषदेकडे जाणार आहेत. या टी.पी.स्किममधील रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा आदी नागरी सुविधांसाठी महापालिकेने नियोजनही केले आहे. परंतू हा भाग आता नगर परिषदेकडे जाणार असल्याने या स्किमचे काम आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed