EY Pune Employee Work Stress | अतिकामामुळे २६ वर्षीय मुलीचा बळी, पुण्यातील कंपनीवर आईचा आरोप

Work Stress

ऑनलाइन टीम – EY Pune Employee Work Stress | अति कामाच्या तणावाने 26 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी तरूणीच्या आईने कंपनीला पत्र पाठवून संबंधित अधिकार्यांवर आरोप केले आहेत. (Ernst & Young in Pune)

केरळमधील सीए तरूणी अॅना सेबॅस्टिन पेरायल (Anna Sebastian Perayil) अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या पुणे कार्यालयात काम करत होती. ती २०२३ मध्ये तिची सीए परीक्षा उत्तीर्ण झाली. मार्च २०२४ मध्ये पुण्यात ईवायमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून ती रुजू झाली. ही तिची पहिलीच नोकरी असल्याने, तिने कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले, पण या प्रयत्नांमुळे तिच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला, असं तिच्या आईचं म्हणणं आहे.

आईने कंपनीला केला ईमेल

पेरायलची आई अनिता ऑगस्टिन यांनी कंपनीचे भारतातील बॉस राजीव मेमाणी यांना एक ईमेल लिहिला आहे. या पत्रात आईने कंपनीला खडे बोल सुनावले आहेत. कंपनीची मानवी हक्क मूल्यं आणि तिच्या मुलीने अनुभवलेली वास्तविकता कशापणे पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.

अनेक कर्मचार्यांनी दिला होता राजीनामा

तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, “कंपनीत रुजू झाल्यानंतर लगेचच तिला अँक्झायटी, निद्रानाश आणि ताणतणाव जाणवू लागला, परंतु कठोर परिश्रम आणि चिकाटी हा यशाचा मार्ग आहे यावर विश्वास ठेवून तिने स्वत:ला पुढे रेटणे सुरु ठेवले.” अॅनाच्या आईने दावा केला की अनेक कर्मचाऱ्यांनी जास्त कामाच्या ओझ्यामुळे राजीनामा दिला, पण आपल्या मुलीच्या बॉसने तिला इथेच राहून टीमबद्दल सर्वांचे मत बदलण्यास सांगितले. माझी मुलगी रात्री उशिरापर्यंत आणि वीकेंडलाही काम करत असे. अॅनाने तिच्यावर असलेल्या कामाच्या प्रचंड ताणाबद्दल सांगितलं होतं. अधिकृतरित्या तिला सोपवलेल्या कामांच्या पलिकडे तोंडी नियुक्त केलेल्या कामांबद्दलही तिने माहिती दिली. मी तिला सांगायचे की अशी कामं करु नकोस, पण तिची मॅनेजर डोक्यावर बसायची त्यामुळे तिने रात्री उशिरापर्यंत काम केलंय, अगदी वीकेंडलाही. तिला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता” असं तिची आई म्हणते.

मृत्यूचं कारण अस्पष्ट

अॅनाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, तिच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी छाती आकुंचित झाल्याची तक्रार केली होती, असे ईमेलमध्ये म्हटले आहे
“आम्ही तिला पुण्यातील हॉस्पिटलमध्ये नेले. तिचा ईसीजी नॉर्मल होता. हृदयरोगतज्ज्ञ म्हणाले
की, तिला पुरेशी झोप मिळत नव्हती आणि ती खूप उशिरा खात होती, हे सांगून त्यांनी अँटासिड्स लिहून दिली,
त्यामुळे आम्हाला खात्री झाली की हे फार गंभीर नाही. मात्र २० जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.” असं अॅनाच्या आईने सांगितलं.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed