Fake Ayushman Card | बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणात ED ची मोठी कारवाई, ‘या’ राज्यांमध्ये धडक कारवाई, काँग्रेस आमदाराच्या घराची झडती

Fake Ayushman Card

नवी दिल्ली : Fake Ayushman Card | अंमलबजावणी संचालयाने (ED) आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे बनावट ओळखपत्र बनविण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने 19 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या प्रकरणी ईडीने दिल्ली, चंदीगढ, पंजाब, हिमाचल प्रदेशमधील कांगडा, ऊना, शिमला, मंडी, कुल्लूमध्ये 19 ठिकाणांवर तपास केला.

बांके बिहारी हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटलसह अनेक हॉस्पिटलमध्ये अशा बनावट कार्डांवर लाखो रुपयांची असंख्य मेडिकल बिल बनविण्यात आली आहेत, ज्यामुळे सरकार आणि लोकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणात हिमाचल प्रदेशातील दोन काँग्रेस नेत्यांची नावे समोर आली आहेत.

हिमाचल प्रदेशच्या नगरोटातील काँग्रेस आमदार आणि हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि हिमाचल प्रदेश पर्यटन विकास बोर्डाचे उपाध्यक्ष आरएस बाली यांचे नाव समोर आले आहे. सोबतच श्री बालाजी अस्पताल कांगडा आणि काँग्रेस नेते डॉ. राजेश शर्मा यांची नावे सुद्धा फसवणुकीत समोर आली आहेत.

त्यांच्या ठिकाणांची सुद्धा झडती घेतली जात आहे.
काँग्रेस आमदार आर एस बाली यांच्याशी संबंधीत ठिकाणे आणि खासगी हॉस्टिलवर छापे मारण्यात आले आहेत.
काँग्रेस नेते डॉ. राजेश शर्मा यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाने तिकिट दिले नव्हते.
अनेक राजकीय नेते ईडीच्या रडारवर आहेत, ज्यामुळे ईडी हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी करत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार