Farmer Died In Solapur | बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

सोलापूर : Farmer Died In Solapur | उन्हाळ्याच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी बैलांना आंघोळ घालत असताना एका शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. त्याचा एक बैलही बुडाला आहे. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, अंकुश काशीनाथ शिरसाट (वय ५५) असे तलावात बुडून मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अंकुश शिरसाट यांनी आपल्या बैलजोडीला अंघोळ घालण्यासाठी गावा जवळच्या सिद्धनाथ साखर कारखान्याच्या पाठीमागच्या तळ्यात नेले. बैलगाडी तळ्यात नेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैलगाडी तळ्यात मध्यभागी गेली. त्यानंतर खोल पाण्यात उलटली. बैलांना वाचविण्यासाठी शिरसाट यांनी प्रयत्न केला. परंतु, ते स्वतः पाण्यात बुडाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यात एका बैलाचाही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे.