FC Road Pune Crime News | फर्ग्युसन कॉलेज कॅम्पमधील आयएमडीआर कॉलेजमधून 43 बॅटर्‍या चोरणारे चोरटे 12 तासात जेरबंद

pune-police-arrest

पुणे : FC Road Pune Crime News | फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये (FC College Campus) असलेल्या आरएमडीआर कॉलेजच्या (IMDR College Pune) युपीएस रुममधील रॅकमधून ४३ युपीएस बॅटरी चोरणार्‍या चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी १२ तासांच्या आत जेरबंद केले.

सचिन शहाजी डोकडे (वय २१, रा. आकाशगंगा सोसायटीसमोर, वडारवाडी), राहुल यंकाप्पा पाथरुट (वय २० रा. जुनी वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आयएमडीआर कॉलेजच्या युपीएस रुममधील जिन्याखाली असलेल्या रॅकमधून ४३ युपीएस बॅटरी चोरीला गेल्याची ४ नोव्हेंबर रोजी तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाली. या तक्रारीवरुन डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी सहकार्‍यांच्या मदतीने तांत्रिक पुराव्या माध्यमातून १२ तासांच्या आत दोन आरोपी निष्पन्न करुन त्यांचा अटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या सर्व बॅटरी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक डी़ जी़ शिंदे पुढील तपास करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस अंमलदार नरेंद्र पवार, सागर घाडगे, वसिम सिद्धीकी, धनाजी माळी, रोहित पाथरुट यांच्या पथकाने केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे औंध -बाणेर रस्त्याचा तीस वर्षांपूर्वीचा प्रश्न सुटला..!

You may have missed