Female Police Constable Suicide | आळंदीत महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या
आळंदी : Female Police Constable Suicide | महिला पोलीस शिपायाने इंद्रायणी नदीत (Indrayani River) उडी मारून आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना समोर आली आहे. अनुष्का सुहास केदार (वय-२०, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.२५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास घडली.
आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके (PI Bhima Narke) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police) कार्यरत होत्या. त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी (दि.२५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरु आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय