Female Police Suicide In Pune | इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; चार दिवसांपासून सुरु होती शोधमोहीम
आळंदी : Female Police Suicide In Pune | इंद्रायणी नदीत (Indrayani River) उडी मारून आत्महत्या केलेल्या महिला पोलीसाचा अखेर चौथ्या दिवशी मृतदेह सापडला आहे. अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे या पोलीस महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केदार यांनी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळील गरुड खांबावरून नदीत उडी मारली होती. अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police) कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या.
त्यानंतर आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु होते. अखेर बुधवारी (दि.२८) संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला आहे.
नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हंटले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली. (Female Police Suicide In Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा