Female Police Suspended In Pune | पुणे: पालखीत दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन, महिला पोलीस शिपाई निलंबित

पुणे : Female Police Suspended In Pune | पालखी सोहळ्यात (Palkhi Sohala) दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) अटक केली होती. आरोपी महिलेला हडपसर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 आर राजा (DCP R Raja) यांनी कर्तव्यात बेजबाबदार व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर (Tarabai Ganpat Khandekar) यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. धुरपता अशोक भोसले (वय-31 रा. टाकळी ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेला सुरक्षेसाठी पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांच्या ताब्यात दिले होते. आरोपी महिलेला पोलीस ठाण्यातील सी.सी.टी.एन.एस रुमध्ये बसवण्यात आले होते. आरोपीने खांडेकर यांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून पळून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.
अटक केलेल्या महिला आरोपीच्या बाबतीत योग्य ती खबरदारी न बाळगता बेजबाबदार व निष्काळजीपणाने, बेपर्वा वर्तन केल्यामुळे आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेली. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
निलंबन कालावधीत मुख्यालय सोडून जायचे असेल तर पोलीस उपायुक्त, मुख्यालय यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
तसेच दररोज राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल.
निलंबन कालावधीत कोणतीही खासगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह निधी स्वीकारावा,
असेही आदेशात नमूद केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर