Filmmaker Sanoj Mishra Arrested In Rape Case | व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोय मिश्रा बलात्काराच्या प्रकरणात अटकेत

Sanoj Mishra-Monalisa

दिल्ली : Filmmaker Sanoj Mishra Arrested In Rape Case | व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारा प्रसिद्ध दिग्दर्शक सनोय मिश्रा यांना दिल्लीमध्ये बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांनी एका तरुणीला चित्रपटात नायिका बनवण्याचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ती 2020 मध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्रामद्वारे मिश्राच्या संपर्कात आली. त्यावेळी ती झांसीमध्ये राहत होती. दोघांमध्ये अनेकदा संवाद झाला. 17 जून 2021 रोजी मिश्रा यांनी झांसी रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगून तिला भेटण्यास बोलावले. मात्र, तिने नकार दिला, यानंतर आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे ती घाबरली आणि शेवटी दुसऱ्या दिवशी भेटायला गेली.

18 जून रोजी मिश्राने तिला एका रिसॉर्टमध्ये नेले, नशेचे पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. एवढेच नाही, तर त्याने तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानंतरही लग्नाचे तसेच चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन देत मिश्रा यांनी तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

You may have missed