FIR Against Virat Kohli Owned One8 Commune | बेंगळुरू मधील विराट कोहलीच्या पब विरोधात FIR दाखल
बेंगळुरू: FIR Against Virat Kohli Owned One8 Commune | बेंगळुरू मधील विराट कोहलीच्या one8 Commune पब विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काल रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा पब चालू ठेवल्याच्या कारणावरून तीन -चार पब वर कारवाई करण्यात आली. मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पब रात्री १:०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना ती वेळ उलटून गेल्यानंतरही पब सुरू ठेवल्याने ही कारवाई झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिलेली आहे.
बेंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या कोहलीच्या पबविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. डीसीपी सेंट्रलने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘आम्ही रात्री उशिरा १:३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या पबवर कारवाई केली आहे. मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. पब फक्त रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, त्यापलीकडे नाही. एमजी रोडवर स्थित one8 कम्युन पब चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. ६ जुलै रोजी, one8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब कामकाज वेळेच्या पलीकडे चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?