FIR On Baburao Chandere | मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल

Baburao Chandere

पुणे : FIR On Baburao Chandere | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण केल्याचा व्हिडियो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/DFQP7J5J-UQ

बाबुराव चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी प्रशांत शंकर जाधव (४८, रा. वारजे माळवाडी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाबुराव चांदेरे यांच्यासह इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DFSCNIDpxXr

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून विजय रौंधळ नावाच्या व्यक्तीला मारहाण करत जमिनीवर आपटले. त्यावेळी फिर्यादी देखील तिथे उपस्थित होते. या घटनेत विजय रौंधळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. चांदेरे यांनी अशाच प्रकारे एका रिक्षाचालकाला यापूर्वी मारहाण केली होती. (FIR On Baburao Chandere)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed