FIR On Dr. Sachin Shashikant Bodhani | पिंपरी: रिअल इस्टेट व्यावसायिकावर बंदूक रोखली, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या डॉक्टरवर FIR
पिंपरी : FIR On Dr. Sachin Shashikant Bodhani | व्याजाने दिलेले पैसे परत करत नसल्याने पुण्यातील एका डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करुन बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली होती. यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एका डॉक्टरने बनावट पिस्टलचा धाक दाखवून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि.7) दुपारी एकच्या सुमारास मोरवाडी भागातील मासुळकर कॉलनीतील नाना पार्क समोर घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत इरफान शामशुद्दीन चौधरी (वय-34 रा. औदुंबर नेस्ट, मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. सचिन शशिकांत बोधनी (वय-49 रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351 (2) (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी इरफान चौधरी हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास मासुळकर कॉलनी येथील नाना पार्क समोर भाच्याची वाट पाहात थांबले होते. त्यावेळी आरोपी डॉ. सचिन बोधनी हा त्याच्या नॅनो कार (एमएच 14 एमएच 4481) मधून जात होता. त्यावेळी रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. आरोपी डॉ. बोधनी फिर्य़ादी यांच्याजवळ आला. तुझ्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आहे, असे म्हणून त्याच्याकडे असलेली बनावट पिस्टल काढून फिर्यादी यांच्यावर रोखली. फिर्यादी यांना बनावट पिस्टलचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी माराहण केली. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून निघून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान