FIR On Rakesh Vittal Marne | मारणे टोळीच्या राकेश मारणे विरुद्ध गुन्हा दाखल ! 30 कोटींचे कर्ज मंजूर करुन देण्यासाठी 12 लाख 80 हजार रुपये घेऊन फसवणूक
पुणे : FIR On Rakesh Vittal Marne | व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन स्टॅम्प ड्युटीसाठी १० लाख ५० हजार रुपये घेऊन सिक्युरिटी म्हणून घेतलेल्या धनादेशपैकी एकावर २ लाख ३० हजार रुपयांची रक्कम टाकून परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
या प्रकरणी सहकारनगरमधील (Sahakar Nagar Pune) एका ६२ वर्षाच्या व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश विठ्ठल मारणे (रा. रिजेंट पार्क, बिबवेवाडी – Bibvewadi) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राकेश मारणे याने दोन वर्षांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला मारणे टोळीची भिती दाखवून जीवे मारण्याची धमकी देत १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकारही डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth Pune) माधव हेरिटेज येथे घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरंभ लक्ष्मी निधी लिमिटेड या फायनान्स कंपनीमधून ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो, असे राकेश मारणे याने सांगितले. त्यांच्याकडून स्टॅम्प ड्युटीसाठी १० लाख ५० हजार रुपये फोन पे व आर टी जी एस द्वारे तीन टप्प्यात स्वत:च्या बँक खात्यावर घेतले. फिर्यादी यांच्याकडून सिक्युरिटी म्हणून १२ धनादेश घेतले होते. त्यापैकी एक धनादेश त्याची आई सुशिला मारणे यांच्या नावाने परस्पर बनवून घेतला. त्यावर २ लाख ३० हजार रुपये रक्कम टाकून ती फिर्यादी यांना काही एक न सांगता काढून घेतले आहेत. फिर्यादी यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. तरी ते कर्ज फिर्यादीच्या खात्यामध्ये अद्याप जमा न करुन राकेश मारणे याने फिर्यादीची १२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी