FIR On Rupali Patil Thombare | जितेंद्र आव्हाडांचे बनावट चॅट व्हायरल केल्याने रुपाली ठोंबरेसह 7 जणांवर गुन्हा दाखल
बीड : FIR On Rupali Patil Thombare | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे बनावट चॅट सोशल मीडियावर (Posting Fake Chat On Social Media) पोस्ट केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांच्यावर बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station Beed) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DEKO6lvJOUQ
रुपाली पाटील ठोंबरे, विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहसीन आझाद शेख (वय ३६, रा. सरगम सोसायटी, नांदेड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ते बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असताना सायंकाळी त्यांना सोशल मीडिया फेसबुकवर जितेंद्र आव्हाड यांचा मोबाईल नंबर व फोटो असलेला व्हाटसअॅप स्किनशॉट आला. त्यात “उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज, मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे, मुंडेविरोधात आणि वाल्याविरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर, पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव़ तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय” हे व्हॉटसअॅप चॅट जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हायरल होत आहे. ही बाब जितेंद्र आव्हाड यांना सांगितली. आरोपींनी बनावट चॅट तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यात मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका,
आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्यालाही संधी द्यावी, मी सांगितले आहे.
कसं काय कुणावर बोलायचं, कसा मंत्री राहतो आणि अजित याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता,
अशा प्रकारचे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हॉटसअॅप चॅट व्हायरल होत आहे.
याची माहिती मिळाल्यानंतर आव्हाड यांनी ते फेक कस आहे, हे सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले आहे.
तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हे सर्व सादर केले आहे. (FIR On Rupali Patil Thombare)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत