FIR On Unauthorized School In Loni Kalbhor Pune | पुणे : लोणी काळभोर येथील अनधिकृत शाळेवर गुन्हा दाखल

loni kalbhor police station

पुणे : FIR On Unauthorized School In Loni Kalbhor Pune | पुणे , पिंपरी-चिंचवड, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून 49 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवडमधील दोन शाळांवर सोमवारी (दि.15) गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर कदमवाक वस्ती (Kadam Wak Wasti) येथील रामदरा सिटी स्कूलवर (Ramdara City English Medium School) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदरा सिटी स्कूलचे संस्थापक मल्हारी कोळपे (रा. लोणी स्टेशन, ता. हवेली), मुख्याध्यापक संभाजी कोळी (रा. संभाजीनगर, लोणी काळभोर) यांच्यावर आयपीसी 419, 34 सह बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कलम 18 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्ञानदेव आबाजी खोसे (वय-55 रा. श्री गणेश सोसायटी, वाघोली, पुणे) यांनी मंगळवारी (दि.16) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (FIR On Unauthorized School In Loni Kalbhor Pune)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमधुंदी एज्युकेश फाउंडेशन संस्थेची कदमवाकवस्ती येथे रामदरा सिटी स्कुल नावाची शाळा आहे. जून 2023 पासून संशयितांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता रामदरा सिटी स्कूल शाळा सुरू ठेवली. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, चिंचवड येथील चिंचवडेनगर मधील लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि चिंचवड
येथील लिंक रोडवरील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर चिंचवड पोलीस ठाण्यात
भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(2), 336(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed