Fire In Ganjave Chowk Pune | गांजवे चौकातील अभ्यासिकेला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक (Video)

Fire In Ganjave Chowk Pune

पुणे : Fire In Ganjave Chowk Pune | गांजवे चौकात असलेल्या एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या अभ्यासिकेला सकाळी भीषण आग लागली. या आगीत अभ्यासिकेतील सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. (Pune Crime News)

https://www.instagram.com/reel/DBS3b_ipmRB/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गांजवे चौकात ध्रुवतारा ही अभ्यासिका तिसर्‍या मजल्यावर आहे. या अभ्यासिकेच्या चालकांनी काल औषध फवारणी (पेस्ट कंट्रोल) केली होती. त्यामुळे अभ्यासिका बंद होती. आज सकाळी अभ्यासिकेतून धूर येत असल्याचे काही जणांना दिसले. त्यानंतर ७ वाजून ३७ मिनिटांनी अग्निशमन दलाला वर्दी मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीची तीव्रता तोपर्यंत वाढली होती. आगीमुळे काचा गरज होऊन खिडकीच्या आणि इतर काचा फुटल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. काही वेळातच आग आटोक्यात आणली. या आगीत अभ्यासिकेत असलेले फर्निचर, कॅम्प्युटर, पुस्तके असे सर्व साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्यानंतर कुलिंगचे काम सुरु आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed