Firing In Front Of Phoenix Mall Pune | फिनिक्स मॉलसमोर गोळीबार करणार्यांना अटक; कारण आलं समोर (Video)

पुणे : Firing In Front Of Phoenix Mall Pune | फिनिक्स मॉल येथे माथाडीचे (Mathadi Worker) काम न मिळाल्याने दहशत निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने (Criminal On Police Record) गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड पोलिसांनी (Wakad Police) फिनिक्स मॉलवरील गोळीबारामागचे कारण उघडकीस आणले असून दोघांना अटक केली आहे.
https://www.instagram.com/reel/DAFjxRCJoyk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अक्षय ऊर्फ बाला लहू शिंदे (वय ३०, रा. राधाकृष्ण कॉलनी, वाकड) आणि त्यांचा पळून जाण्यास मदत करणारा रंजित नथुराम सलगर (वय २४, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा) यांना अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/DAD3BxzJwAD
वाकड येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall Wakad) येथे १७ सप्टेबर रोजी सायंकाळी ६ वाजता फायरिंग केल्याचे उघडकीस आले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा हे फायरिंग बाळु शिंदे याने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याचे व कारमधून पळून गेल्याचे दिसून आले. अक्षय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात जबरी चोरी (Robbery Case), मारामारीचे दोन गुन्हे दाखल होते. तो लपून बसला होता.
https://www.instagram.com/p/DADIdnyJgoy
वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने त्याचा ठावठिकाणी शोधून त्याला टिपटॉप हॉटेल (Hotel Tip Top Wakad) समोरील सर्व्हिस रोड आंडरपास येथे सापळा लावून पकडले. त्याला पळून जाण्यासाठी वापरलेली कारचा चालक रंजित सलगर याला कारसह वाकड येथील भुमकर चौकातून (Bhumkar Chowk Wakad) गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने ताब्यात घेतले. (Pimpri Chinchwad Crime Branch)
गोळीबार करण्यामागचे कारण विचारले असता शिंदे याने सांगितले की, फिनिक्स मॉल येथे त्यास माथाडीचे काम मिळण्याबाबत पूर्वी सांगितले होते. परंतु, त्याला काम न मिळाल्याने त्याने दहशत निर्माण करण्याकरीता फायरिंग केल्याचे सांगितले. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/DADSpz_JL_a
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinoy Kumar Choubey) , सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर (Shashikant Mahavarkar), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे (DCP Sandeep Doifode), पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड (DCP Vishal Gaikwad), सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (ACP Vishal Hire), सुनिल कुराडे (ACP Sunil Kurade) यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर (PI Nivrutti Kolhatkar), गुन्हे शाखा युनिट ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत (PI Sandeep Sawant), सहायक पोलीस निरीक्षक पदमभूषण गायकवाड (API Padma Bhushan Gaikwad),
पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण (PSI Sachin Chavan), अनिरुद्ध सावर्डे ( Anirudh Savarde), साळुंखे,
बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिश जाधव,
अतिक शेख, प्रशांत गिलबिले, संतोष महाजन, रामचंद्र तळपे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, भास्कर भारती, कोतेंय खराडे,
रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर कोतवाल, मंगेश लोखंडे, तसेच गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस अंमलदार नदाफ,
मुंडे, शेटे, गावंडे, गुट्टे व जायभाय यांनी मिळून केली आहे. (Firing In Front Of Phoenix Mall Pune)
https://www.instagram.com/p/DADKCk4JAtA
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा